पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : PM मोदींच्या संदेशावर भारतीय लष्कराकडून प्रतिक्रिया

भारतीय लष्करी जवान (संग्रहित छायाचित्र)

कोविड-१९ विरोधातील लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित करत असताना देशवासियांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, रविवारी ५ एप्रिल रोजी मेणबत्ती तसेच दिवा पेटवत असताना काळजी घ्या. हात धूण्यासाठी साबणाचा वापर करा. जे सँनिटायझर वापरणार आहात ते अल्कोहलमुक्त असेल याचीही दक्षता घ्या, असे लष्कराने म्हटले आहे.  

रविवारी रात्री ९ वाजता प्रत्येकांनी ९ मिनिटांचा वेळ द्या- पंतप्रधान

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार निरंतर प्रकाश प्रज्वलित करुन दूर करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करुन या नऊ मिनिटांत प्रत्येकांने  दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे. 

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. काहीजण मोदींना साथ देण्यासाठी अशा प्रकारे एकत्र येण्याच्या गोष्टीचे समर्थन करत आहेत. तर विरोधकांनी मोदींचा हा संदेशावर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता लष्कराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनला समर्थन दिल्याचे पाहायला मिळते आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:be careful while lighting diyas or candles Use soap to wash your hands and not alcohol based sanitizers says Indian Army