पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडिलांच्या मर्जीविरोधात लग्न करणारी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत

साक्षी मिश्रा

वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणारी आमदार राजेशकुमार मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी साक्षीने लोकांना आवाहन केले असून, आपल्या कुटुंबियांना बदनाम केले जाऊ नये, असे म्हटले आहे. आपल्याविषयी आणि आपल्या कुटुंबाविषयी सोशल मीडियावर प्रसारित झालेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे साक्षी मिश्रा हिने म्हटले आहे. या संदर्भात तिने काही युट्यूब चॅनेल्सविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

VIDEO: वायूदलाचे थरारक बचावकार्य; पूरात अडकलेल्या दोघांची सुटका

आपल्या तक्रारीमध्ये साक्षी मिश्रा हिने म्हटले आहे की, माझ्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांविरुद्ध चुकीची माहिती प्रसारित करून त्यांना बदनाम करण्याचा प्रकार काही जणांकडून केला जातो आहे. यामुळे देशाचीच बदनामी होते आहे. याचा परिणाम माझ्या वडिलांच्या राजकीय प्रवासावरही झाला आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण तयार होते आहे. काही जणांकडून मनाला येईल ते सांगितले जाते आहे. यामुळे आम्हाला विनाकारण अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मला आणि माझ्या नवऱ्याला शांतपणे आपले आयुष्य जगायचे आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या पाठिशी'

काही दिवसांपूर्वीच साक्षीने अजितेश कुमार यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांविरोधात काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. वडिलांच्या गुंडांकडून आपल्या आणि नवऱ्याच्या जिवाला धोका असल्याचे साक्षीने म्हटले होते. आता साक्षी मिश्रा पुन्हा एकदा वडिलांच्या बाजूने बोलताना पाहायला मिळते आहे.