पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साक्षी म्हणते, मला आता घरच्यांबद्दल काहीच बोलायचे नाही

साक्षी मिश्रा आणि अजितेश

दलित मुलाशी विवाह केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेली उत्तर प्रदेशमधील आमदाराची मुलगी साक्षी मिश्रा हिने आता आपल्याला कुटुंबीयांबद्दल काहीही बोलायचे नाही, असे म्हटले आहे. साक्षी आणि तिचा नवरा अजितेश यांना सोमवारी प्रयागराज उच्च न्यायालयात हजर व्हायचे आहे. रविवारी 'हिंदूस्थान'शी बोलताना साक्षी म्हणाली की तिला आता आई-वडिलांबद्दल काहीही बोलायचे नाही. जे काही सांगायचे होते ते तिने सांगितले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून मॉडेल तरुणीची प्रियकराकडून हत्या

साक्षी म्हणाली की, माध्यमांच्या साह्याने माझ्या मनातील घालमेल मी सगळ्यांसमोर मांडली. मी कुटुंबीयांवर कोणताही आरोप केलेला नाही. घरामध्ये मला ज्या गोष्टी त्रास देत होत्या. त्याच मी मांडल्या आहेत. मला माझ्या आई-वडिलांशिवाय इतर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही, हे सुद्धा खरेच आहे, असेही तिने म्हटले आहे. पण मला आता त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. आधी मला असे वाटायचे की आपली लढाई वडिलांशी आणि भावाशी आहे. पण मला आता असे जाणवते आहे की माझी लढाई असा विचार करणाऱ्या सगळ्यांशीच आहे, असे तिने म्हटले आहे.

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी

दरम्यान, अजितेश याच्या पार्श्वभूमीबद्दल काही व्हिडिओ समोर आले आहेत. पोलिसांकडून त्याचा तपास केला जातो आहे. निळ्या दिव्याच्या गाडीतून फिरणे, हवेत गोळीबार करणे आणि पिस्तुल उंचावणे असे अनेक प्रकार करताना अजितेश व्हिडिओमध्ये दिसतो आहे. समाजवादी पक्षाचे नेते वैभव गंगवार यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्येही अजितेश वैभव गंगवार यांच्यासोबत दिसतो आहे. जर यामध्ये अजितेश दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले.