पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दलित तरुणाशी विवाहः भाजप आमदाराच्या मुलीच्या पतीचे व्हिडिओ व्हायरल

अजितेश कुमार

बरेलीतील (उत्तर प्रदेश) वीर सावरकरनगरमधील साक्षी-अजितेश प्रकरण समोर आल्यानंतर त्या परिसरातील काही लोकांनी अजितेश हा दलित असल्याचे आत्ताच माहीत झाल्याचे म्हटले आहे. अजितेश परिसरातील लोकांना स्वतः क्षत्रिय असल्याचे सांगत असत. वीर सावरकरनगर कल्याण समितीचे अध्यक्ष अभियंता ए के सिंह यांनी सांगितले की, 'अजितेशने आपल्या गाडीच्या मागे ठाकूर लिहिले होते. आता अचानक वृत्त वाहिन्यांवर तो दलित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वडील हरीश सिंह नायक पूरनपूरमधून आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत. त्यांनी आमदारकी लढवावी, पण कोणाला असे बदनाम करु नये.'

दलित तरुणाशी लग्नामुळे वडील मारण्याच्या तयारीत, भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

अजितेशचे अनेक व्हिडिओ व्हायरलः अजितेश चिलम ओढतानाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर वीर सावरकरनगरमध्ये राहणारे दिनेश गिरी, युवा सिंधी समाजाचे संघटन मंत्री रवी लेखवानी यांनी अजितेश हा दादागिरी करत असत, असे म्हटले. त्याच्याविरोधात प्रेमनगर आणि इज्जतनगरमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.

दलित तरुणाशी लग्नामुळे चर्चेत आलेल्या साक्षी मिश्रा प्रकरणाला नवे वळण

काही दिवसांपूर्वी सपा नेते वैभव गंगवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ केला होता. पोलिसांबरोबर वाद आणि गैरवर्तन करण्यात आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यानंतर पोलिसांनी वैभव गंगवारला अटक केली होती.

वैभव गंगवारबरोबर पोलिस ठाण्यात अजितेश सिंहही गोंधळ करताना दिसला होता. आता पुन्हा किला ठाण्यात गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्येही गंगवारबरोबर अजितेश दिसतो. निळ्या रंगाचा दिवा लावलेल्या गाडीबरोबर नाचताना अजितेश सिंहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.