पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशव्यापी संप: ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला बँका राहणार बंद

बँक बंद

भारतीय बँक असोसिएशनशी (आयबीए) वेतन करारावरील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर बँक युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँक युनियनने देशव्यापी बँक संप पुकारला आहे. तर एप्रिलपासून बेमुदत संप जाहीर करण्यात आला आहे. वेतन करारावरील चर्चा अयशस्वी झाल्याने बँक युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  इतकेच नाही तर सलग तीन दिवस ११, १२ आणि १३ मार्च रोजी बँकेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

मार्च महिन्यात होळी आणि इतर सुट्ट्यांसह आठ दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे. बँक युनियनने जारी केलेल्या माहितीनुसार, मागण्या मान्य झाल्या नाही तर १ एप्रिलपासून बँका अनिश्चित काळासाठी संपावर जातील. दरम्यान, ८ जानेवारी रोजी देखील बँका संपावर गेल्या होत्या. 

पीएमसी बँक: वाधवान पितापुत्रांची सुटका, निवासस्थानी कैदेत

नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ दहा केंद्रीय कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्यामुळे सर्व बँक कर्मचारी संपावर गेले होते. दरम्यान,  ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण आल्यास १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.

DIG मोरे प्रकरण: मुलीसोबत सापडलेल्या तरुणाविरोधात गुन्हा