पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व विधेयक: बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी भारत दौरा रद्द केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ए. के. अब्दुल मोमेन १२ ते १४ डिसेंबर असे तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र नागरिकत्व संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे.

आजपासून मी BJP च्या कोअर कमिटीची सदस्य नाही : पंकजा मुंडे

परराष्ट्र मंत्रालयाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मोमेन गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता भारतात येणार होते. त्याचा तीन दिवसांचा भारत दौरा होता. नागरिकत्व संशोधन विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर झाले. त्याआधी या विधेयकाला लोकसभेमध्ये मंजूरी मिळाली होती. या विधेयकाविरोधात आसाम आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. 

गोपीनाथ मुंडे असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो: एकनाथ खडसे

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. आसामच्या दहा जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आसाममध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर तिथे लष्कराच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे.  आसाममध्ये जाणारी काही विमाने आणि रेल्वे रद्द करण्यात आली आहे त्यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत.

न्याय मिळेल पण बोलण्यातून जखमा करू नका - चंद्रकांत पाटील