पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्यात गर्दी जमवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या विनयला पोलिस कोठडी

विनय दुबे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्धेशाने देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबईतील वांद्र्यात मजुरांची गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. मजुरांची दिशाभूल करुन त्यांना स्टेशनवर एकत्रित करण्याच्या आरोपात विनय दुबे नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी केली असून त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

मुंबई पोलिसांनी अटकेनंतर विनय  दुबे याला आज स्थानिक न्यायालयात हजर केले होते. परप्रांतिय मजुरांना एकत्रित करण्यात विनयचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान  हजारोच्या संख्येने मजुर आपापल्या गावी जाण्यासाठी वांद्र्याच्या स्टेशनवर जमले होते. लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करुन गर्दी केलेल्या मजुरांवर पोलिसांना सौम्य लाठिचार्जही करावा लागला होता.  

लॉकडाउन : हॉटस्पॉट नसणाऱ्या ठिकाणी सूट मिळेल, पण....

लॉकडाउनमुळे मजुरांवर मोठे संकट ओढावले आहे. वेगवेगळ्या राज्यातून कामानिमित्त मुंबईत आलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यांदर्भातील मोहिम विनयने सोशल मीडिाच्या माध्यमातून सुरु केल्याचा आरोपही करण्यात आलाय. १३ एप्रिलला विनयने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या उत्तर भारतातील मजुरांना गावी पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशी मागणी केली होती. याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करु, असा इशाराही त्याने दिला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bandra station case Vinay Dubey accused of mob gathering sent to police custody till 21 April