पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींकडून दीप प्रज्वलनाचं आवाहन, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी केलं फायरिंग

 हवेत गोळीबार करताना मंजू तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशभरात रविवारी रात्री ९ वाजल्यापासून ९ मिनिटांपर्यंत दिवे, मेणबत्ती आणि टॉर्च लावून एकजुटतेचा संदेश दिला. याचदरम्यान उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यात भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी यांनी दिवे लावल्यानंतर हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर मंजू तिवारी यांनी याचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

मंजू तिवारी या घरात दिवा लावल्यानंतर पती ओमप्रकाश तिवारी यांची परवाना असलेली रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आल्या आणि कोरोना विषाणू पळवून लावण्यासाठी हवेत गोळीबार सुरु केला. विशेष म्हणजे गोळीबार करताना त्यांनी व्हिडिओही बनवला आणि आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केला. फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, दिप प्रज्वलन केल्यानंतर कोरोना विषाणूला पळवून लावताना. 

पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन

तर, दुसरीकडे काँग्रेसने मंजू तिवारींचा व्हिडिओ टि्वट करुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यावर कारवाई करणार का, असा सवाल केला आहे. कायदा मोडण्यात भाजपचे नेतेच सर्वांत पुढे असतात. रविवारी पंतप्रधानांनी दिवे लावण्याचे आवाहन केले. पण पाहा भाजप नेत्या आणि बलरामपूर भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी खुलेआमपणे गोळीबार केला आणि व्हिडिओ फेसबुकवर टाकला. योगी आदित्यनाथ यावर कारवाई करणार का?, असे काँग्रेसने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगर कोतवाली पोलिसांनी मंजू तिवारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. तर मंजू तिवारी यांनी एका माध्यमातून माफी मागितली असून यानंतर पुन्हा असे कधी करणार नसल्याचे म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Balrampur BJP woman district president Manju Tiwari did firing on PM Modi appeal to lightup the lamp VIDEO viral on social media