पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्यामाप्रसाद मुखर्जी मृत्यूः राज्यपालांचे नेहरु, अब्दुल्लांवर आरोप

श्यामाप्रसाद मुखर्जी (HT Photo)

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूवरुन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, तत्कालीन गृहमंत्री के एन काटजू आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रॉय यांनी बलिदान दिवसानिमित्त टि्वट करत हा एक कट होता असे म्हटले आहे. या कटाअंतर्गत मुखर्जींना जम्मू-काश्मीरला आणण्यात आले. तो भाग सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाही. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करण्यात आला. नेहरु आणि काटजू श्रीनगरमध्ये असतानाही ते त्यांना पाहायला गेले नाही, असे त्यांनी म्हटले. 

रॉय यांनी टि्वट करत म्हटले की, आज बलिदान दिवस आहे. आजच्याच दिवशी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे नजरबंदी दरम्यान शहीद झाले होते. त्यांना कट रचत जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले. कारण तो भाग सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा दाखवण्यात आला. हा हलगर्जीपणा शेख अब्दुल्ला यांनी केला होता.

त्यांनी म्हटले, लोकसभेतील सर्वांत महत्वपूर्ण सदस्याला आपले अंतिम क्षण एखाद्या अनाथाप्रमाणे एका छोट्या खोली व्यतीत करावा लागला. त्यांच्या खोलीत टेलिफोनही नव्हता. त्याचबरोबर त्यांना श्रीनगरपासून खूप लांब ठेवण्यात आले होते. नेहरु आणि त्यांचे गृहमंत्री के एन काटजू हे त्यादरम्यान श्रीनगरला गेले होते. पण त्यांना ५ मिनिटे भेटायलाही गेले नाहीत.

Exclusive: आता अपमान सहज पचवतो- पंतप्रधान मोदी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:balidan divas tripura governor Tathagata Roy charges against javaharlal nehru and sheikh abdullah on death of syama prasad mukherjee