पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी घेतली राहुल गांधींची भेट

बाळासाहेब थोरात, सोनिया गांधी, राहुल गांधी

महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्ली येथे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी आता बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

धारावीत नाल्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विवकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसंच पाच कार्यकारी अध्यक्षांची देखील निवड करण्यात आली आहे. यामध्ये नितीन राऊत, विश्वजित कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 

राज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या