पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोट हवाई हल्ल्यांमुळे अशक्य वाटणारे शक्य झाले - हवाई दल प्रमुख

सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज या थिंक टँककडून एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्यावर्षी बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे या पद्धतीनेही पाकिस्तानातील लक्ष्य भेदले जाऊ शकते, हे स्पष्ट झाले. याआधी विमानांच्या साह्याने पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करणे अशक्य समजले जात होते. पण बालाकोटनंतर हे शक्य असल्याचे सिद्ध झाले, असे मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. 

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज या थिंक टँककडून एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भाषण करताना भदौरिया म्हणाले, नेहमीच्या पद्धतीने दहशतवाद्यांना उत्तर देण्याबरोबरच हवाई दलाच्या साह्यानेही त्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले जाऊ शकतात, याचे बालाकोटमधील हल्ले हे एक उदाहरण होते. जोपर्यंत केंद्र सरकार कठोर आणि आव्हानात्मक भूमिका घेत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीने हवाई हल्ले करणे शक्य नसते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक

यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत म्हणाले, सैन्यदलांकडे दिलेले कामाचे पडसाद काय उमटतील हे जाणून कारवाई करावी लागते. पण सैन्यदलातील नेतृत्त्व आणि राजकीय नेतृत्त्व यांच्या इच्छाशक्ती आणि अनुभवावरून हे शक्य होऊ शकते. कारगिल, उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर हे सातत्याने दिसून आले आहे.