पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून बालाकोटचा हल्ला केला, लष्कर प्रमुखांची प्रतिक्रिया

बिपीन रावत

फेब्रुवारी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केल्याच्या हवाई दलाच्या कारवाई संदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीमारेषेपलिकडे प्रशिक्षण मिळत असलेल्या दहशतवाद्यांकडून भारताविरुद्ध कोणती कारवाई होऊ नये, यासाठी भारताकडून हवाई हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सीमारेषेलीकडील दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी संस्था प्रयत्नशील आहेत. 

आयसिसचे १५ दहशतवादी बोटीत दिसले, केरळमध्ये हायअलर्ट

पत्रकारांशी संवाद साधताना बिपीन रावत म्हणाले की, ''वेगळ्या सरकारी संस्थांच्या प्रयत्नानंतर आता एनआयएने दखल घेतली आहे. दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा पूर्णपणे बंद करुन त्यांचे इरादे उधळून लावण्यात यश मिळत आहे. सध्या सर्व नियंत्रणात असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यापासून भारत दहशतवादाचा सामना करत आहे. सेना आणि सुरक्षा यंत्रणेशी संबंधित संस्था त्याला प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवादावर नियंत्रण मिळवणे हेच आमचे लक्ष्य आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा चढ-उतार निश्चितच पाहायला मिळतो. त्यांना आपल्या शेजारी असलेल्या पश्चिमी राष्ट्रांकडून मदत मिळत आहे. मात्र आम्ही ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

डीआरडीओकडून ‘ग्लाईड बॉम्ब’ची यशस्वी चाचणी

यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रडार संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दलही विचारणा करण्यात आली होती. यावर ते म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारच्या रडार यंत्रणेचा वापर सध्या केला जात आहे. काहींमध्ये ढगांचा अडथळा येत नाही तर काही रडार ढगाळ वातावरणात निष्क्रिय ठरु शकतात. मोदींनी एका मुलाखतीमध्ये ढगाळ वातावरणात पाकिस्तानवर हल्ला केल्यास आपल्या फायद्याचे ठरेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:balakot attack was to ensure terrorists do not carry out action against india says general bipin rawat