पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरफोर्सच्या कॅलेंडरमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकचा उल्लेख

एअरफोर्सच्या कॅलेंडरमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकचा उल्लेख

भारतीय हवाईदलाने यावर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये (कॅलेंडर) एअरस्ट्राइकचाही समावेश केला आहे. वर्ष २०२० च्या आपल्या अधिकृत कॅलेंडरमध्ये भारतीय हवाईदलाकडून करण्यात आलेले एअरस्ट्राइक दाखवण्यात आले आहे. 

जजच्या पत्नी-मुलाची हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला फाशीची शिक्षा

बालाकोट एअरस्ट्राइकची माहिती देणारे छायाचित्र फेब्रुवारी महिन्यात दाखवण्यात आले आहे. कॅलेंडरमध्ये मिराज २००० जेट विमानेही दाखवण्यात आले आहेत. मागील बाजूस काही पर्वत दिसत आहेत आणि जेट विमाने खाली बॉम्बवर्षाव करताना दिसत आहेत. 

दि. २६ फेब्रुवारी २०१९ ला भारतीय हवाईदलाचे १२ मिराज २००० जेट्सने नियंत्रण रेषा पार करत बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी शिबिरांवर हल्ला केला होता. या ऑपरेशनमध्ये सुमारे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले होते. 

स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार आणखी स्वस्त

एअरस्ट्राइकनंतर तत्कालीन परराष्ट्र सचिव विजय गोखलेने म्हटले होते की, गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, जैश-ए-मोहम्मद देशातील विविध भागात आणखी एक आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. या फिदायीन जिहादींना त्या शिबिरांमध्ये प्रशिक्षण दिले जात होते. त्यामुळेच हे ऑपरेशन राबवण्यात आले होते.

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी