पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायना नेहवाल भाजपमध्ये, मोदींबद्दल नितांत आदर केला व्यक्त

सायना नेहवालने भाजपत प्रवेश केल्यावर अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली.

बॅडमिंटन कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवल्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता राजकारणात प्रवेश करीत आहे. बुधवारी सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सायनाचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. 

दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांच्या उपस्थितीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिने सुद्धा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 

सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती बुधवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने पसरली. अखेर दुपारी तिने पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात सायना म्हणाली, अतोनात कष्ट घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी भाजपची ऋणी आहे. पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेने पूर्ण करेन, असेही तिने सांगितले.