पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जन्मल्यानंतर ३० तासांत बाळालाही कोरोनाची लागण

कोरोना विषाणू

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. वुहान हे शहर या विषाणूचे केंद्रबिंदू आहे. या देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५०० हून अधिक बळी गेले आहेत. आता चीनमध्ये कोरोनाचा  सर्वात लहान  रुग्ण समोर आला आहे. जन्मल्यानंतर तीस तासांत बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.

केवळ वेतनातून उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांसाठी खूशखबर

या बाळाच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. बाळाला जन्म देण्यापूर्वी तिची तपासणी करण्यात आली होती. यात तिला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तिनं मुलाला जन्म दिल्यानंतर ते मुलं सुरक्षित होतं. त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र जन्मल्यानंतर ३० तासांत त्यालादेखील या विषाणूची बाधा झाली आहे. 

राम जन्मभूमी ट्रस्टमधील एक विश्वस्त कायम दलित समाजातील - अमित शहा

जगात कोरोनाची लागण झालेला हा सर्वात लहान रुग्ण आहे. या आजारातील ८० % मृत पावलेल्या रुग्णांचं वय हे ६० पेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. चीनमध्ये नववर्षांसाठी अनेक नागरिक देशाबाहेरून आले होते, त्यामुळे हा विषाणू अधिक परसला असल्याची शक्यता आहे. हा आजार नेमका कशामुळे झाला याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.