पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लहान मुलीसह चौघे जखमी

प्रातिनिधिक छायाचित्र

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका घरावर केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलीसह चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीर पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी गोळीबार करून एका घरातील चौघांना जखमी केले. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. उस्मा जान असे तिचे नाव आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रत्येक भारतीयाने देशहितासाठी संकल्प करावा, मोदींचा नवा मंत्र

कलम ३७० रद्द केल्यापासून आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश केल्यापासून राज्यात तणाव आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ५ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मला मोदीजींचा अभिमान: उद्धव ठाकरे

कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये कोणतीही मोठी दहशतवादी घटना घडलेली नाही. काही ठिकाणी गोळीबार झाल्याचे दिसून आले आहे. २८ ऑगस्ट रोजी त्राल सेक्टर भागामध्ये दहशतवाद्यांनी दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.