पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बाबरी मशिद प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आव्हान देणार नाही'

रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटला

रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यात जो निर्णय देईल. तो आपल्याला मान्य असेल. त्याला परत आव्हान देणार नसल्याचे या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी यांनी म्हटले आहे. न्यायालय जो निकाल देईल, तो आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, याचा मला आनंद होतो आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले.

मुंबईत ७३ कोटींच्या पाण्याची चोरी, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात इकबाल अन्सारी यांचे वडील हाशिम अन्सारी हे सर्वांत जुने वादी होते. इकबाल अन्सारी म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण होते आहे. पण आता निकालानंतर या शहराचा विकास होईल, अशी मला आशा आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या कायदेशीर लढाईला अंतिम रूप देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. 

महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होताः दिग्विजय सिंह

त्यांनी सांगितले की, जुलै २०१६ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. आधी ते शिलाई काम करायचे नंतर त्यांनी सायकल दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात केली. १९४९ पासून ते बाबरी मशिद प्रकरणाशी जवळून संबंधित होते. मशिदीमध्ये रामाची मूर्ती स्थापित केल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले म्हणून त्यांना अटकही करण्यात आली होती.