पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...अखेर त्या वक्तव्यावरून आझम खान यांनी मागितली माफी

आझम खान

भाजपच्या खासदार रमा देवी लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून कामकाज पाहात असताना त्यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी सोमवारी माफी मागितली. यापूर्वी माझे वक्तव्य चुकीचे नसून माफी मागणार नाही, असे आझम खान यांनी म्हटले होते. पण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक गेल्या आठवड्यात बोलावली होती. त्यावेळी आझम खान यांनी माफी मागितली पाहिजे, असे एकमताने निश्चित करण्यात आले.

राज ठाकरे हे प्रसिद्धीसाठी स्टंट करणारे नेतेः प्रकाश आंबेडकर

सोमवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर आझम खान यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली. लोकसभा हे देशातील सर्वांचे सभागृह आहे. प्रत्येकाच्या पाठिंब्यावर ते चालते. सभागृहाचा अवमान होईल, असे कोणतेही वक्तव्य कोणत्याही सदस्याने करू नये, असे ओम बिर्ला यांनी सांगितले.

त्यापूर्वी रमा देवी यांनी आझम खान यांच्यावर जोरदार टीका केली. आझम खान यांच्या वक्तव्यामुळे पुरुष आणि महिला दोघांचा अपमान झाला आहे. आझम खान यांना अशी वक्तव्ये करण्याची वाईट सवयच लागली आहे. मी या सभागृहात अशा प्रकारची वक्तव्ये ऐकण्यासाठी आलेली नाही, असे रमा देवी म्हणाल्या.

उदित नारायण यांना जीवे मारण्याची धमकी, घराबाहेरील गस्त वाढविली

माझ्या बोलण्यामध्ये सभागृहाच्या अध्यक्षांबद्दल कोणतीही दुर्भावना नव्हती. माझे आचरण सर्वांना माहिती आहे. तरीही माझ्या बोलण्यामुळे माझी चूक झाली असल्याचे अध्यक्षांना वाटत असेल, तर मी माफी मागतो, असे आझम खान यांनी म्हटले आहे.