पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकाल असमाधानकारक, फेरविचार याचिकेसाठी सल्ला घेऊ - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेताना (फोटो - मोहम्मद झाकीर)

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल आमच्यासाठी असमाधानकारक असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी झफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे. या निकालासंदर्भात आम्ही ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करू आणि त्यानंतर फेरविचार याचिका दाखल करायची की नाही हे ठरवू, असेही त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक निर्णय! अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची-सुप्रीम कोर्ट

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त २.७७ एकर जागेची मालकी रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांकडे देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचवेळी केंद्र सरकारने १९९३ मध्ये अधिग्रहित केलेल्या उर्वरित ६७.६ एकर जागेपैकी या पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो. पण त्यातील काही निरीक्षणे आम्हाला अमान्य आहेत. विशेषतः केवळ नमाज पठण होत नव्हते म्हणजे तिथे मशिद नव्हती, असे न्यायालयाने म्हणणे आम्हाला मान्य नाही. न्यायालयाने जो निकाल दिला आहे. त्यासाठी वापरलेले सर्व पुरावे हे त्या ठिकाणी मशिद होती असेच आहेत. तरीही न्यायालयाने वादग्रस्त जागेमध्ये आम्हाला हिस्सा दिलेला नाही. आता या प्रकरणी आम्ही ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन फेरविचार याचिका दाखल करायची की नाही, हे ठरवू असे झफरयाब जिलानी यांनी सांगितले. 

... म्हणून अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शनिवारी निकाल दिला

न्यायालयाने दिलेल्या निकाला आदर करून सर्वांनी शांतता पाळली पाहिजे, असेही आवाहन झफरयाब जिलानी यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ayodhya verdict Zafaryab Jilani All India Muslim Personal Law Board We will file a review petition if our committee agrees on it