पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितला 'रोडमॅप'

अयोध्या

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय देताना वादग्रस्त जागेवर मंदिर निर्मितीचा आदेश दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला तीन महिन्यांच्या आत विश्वस्त मंडळ गठीत करुन वादग्रस्त स्थानावर मंदिर निर्मितीसाठी देण्यास सांगितले. केंद्र सरकारने सुन्नी वक्फ बोर्डला मशीद उभारण्यासाठी अयोध्येत ५ एकर पर्यायी जमीन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 

ऐतिहासिक निर्णय! अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची-सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला. पण केंद्राला आदेश दिला की, मंदिर निर्मितीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विश्वस्त मंडळात त्यांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जावे. मंदिराची निर्मिती कशी होईल, हे विश्वस्त मंडळ निश्चित करेल.

वादग्रस्त जमिनीवर आपलाच अधिकार होता, याचे पुरावे मुस्लिमांना सादर करता आले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले. जमिनीची वाटणी करणे आणि सुन्नी वक्फ बोर्डला हिस्सा देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचा होता, असेही न्यायालयाने म्हटले.

धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा दरवाजा बंद झाला: काँग्रेस

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातील मध्यस्थ निवृत्त न्या. कलीफुल्लाह, श्रीराम पांचू आणि श्री श्री रविशंकर यांच्या भूमिकेचे कौतुक केले. मध्यस्था हे प्रकरण मिटवण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले होते, असे मत न्यायालयाने नोंदवले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ayodhya verdict Supreme Court Verdict on Ram Temple babri masjid Center To Constitute Board Of Trustees For It