पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विविधतेत एकतेचा मंत्र पाहायला मिळालाः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आपल्यासठी एक नवीन सकाळ घेऊन आला आहे. या वादामुळे भलेही अनेक पिढ्यांवर परिणाम झाला असेल. पण या निकालानंतर आपल्याला एक संकल्प करावा लागेल की, एक नवीन पिढी नव्या उमेदीने न्यू इंडियाच्या निर्मितीत सहभागी होईल. 

लवकरच अडवाणींची भेट घेणार : उद्धव ठाकरे

ते म्हणाले, आता समाजाच्या नात्याने प्रत्येक भारतीयाला आपले कर्तव्य, आपल्या दायित्वाला प्राथमिकता देत काम करायचे आहे. आपल्यामधील सौहार्द, आपली एकता, आपली शांतता, देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. नव्या भारतात भय, कटुता, नकारात्मकतेला कोणतेच स्थान नाही. आज अयोध्येवरील निर्णयाबरोबरच ९ नोव्हेंबरच्या तारखेने आपल्याला एकत्र घेत पुढे जाण्याचा धडाही दिला आहे. आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आणि एकत्र जाण्याचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामागे आपली दृढ इच्छाशक्ती दाखवली आहे. यासाठी देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि आपली न्यायप्रणाली अभिनंदन पात्र आहेत. भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस एक सुवर्ण अध्याय आहे. या विषयाच्या सुनवाणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्वांचे ऐकले, मोठ्या धैर्याने ऐकले आणि सर्वसंमतीने निर्णय दिला. निर्णय आल्यानंतर प्रत्येक वर्गाने, समुदायाने आणि पंथाच्या लोकांनी संपूर्ण देशाने खुल्या मनाने याचा स्वीकार केला आहे. 

देशातील प्रत्येक नागरिकावर राष्ट्र निर्माणाची जबाबदारी सर्वांवर आहे. प्रत्येक भारतीयाला आपले कर्तव्य, आपले दायित्व पार पाडायचे आहे. आपल्याला भविष्यातील भारतासाठी काम करायचे आहे. नव्या भारतात भिती, कटुतेला स्थान नाही. सर्वांना सोबत घेऊन विश्वास संपादन करायचा आहे.