पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या निकाल : ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड देणार आव्हान

ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

अयोध्याच्या ऐतिहासिक निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचा निकाल निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होतो. रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्व मान्य करत  सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठानं हा निकाल दिला होता. 

'राम मंदिर झाले; लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाल्यास राजकारण सोडतो

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालासंदर्भात विचार करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची रविवारी लखनऊमध्ये बैठक पार पडली. यावेळी न्यायालयाने ५ एकर पर्यायी जागा नाकारण्यासोबत निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. उल्लेखनिय आहे की, मुस्लिमांना मशीद उभारण्यासाठी ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही न्यायालयाने निकालावेळी दिले होते. 

अखेर काडीमोड!, शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

बैठकीनंतर यमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा मुस्लिम पक्षाच्या विरोधातील आहे. आमची याचिका फेटाळली जाईल याची देखील आम्हाला कल्पना आहे. पण याचिका दाखल करणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे  आम्ही अधिकाराचा वापर करणार आहोत. यापूर्वी उत्तर प्रदेश सेंट्रल वक्फ बोर्डने अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. निर्णयाला आव्हान देण्याचा आमचा कोणताच विचार नाही, असे बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी म्हटले होते.