पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरण: निकाल देणाऱ्या 'त्या' न्यायाधीशांना 'झेड' सुरक्षा

अयोध्या प्रकरणातील ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना झेड सुरक्षा पुरवण्याचे आदेश

अयोध्या प्रकरणातील ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील न्यायाधीश अब्दुल नजीर आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड दर्जा सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कट्टरपंथीय संघटनेकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याच्या संशयानंतर केंद्राने त्यांनी झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

अयोध्या निकाल : ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड देणार आव्हान

गृह मंत्रालयाकडून सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांना न्यायाधीश नजीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचे उपाय करण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. केरळमध्ये सक्रिय असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर काही कट्टरपंथी संघटनांकडून जस्टिस नजीर यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. 

'राम मंदिर झाले; लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाल्यास राजकारण सोडतो'

न्यायाधीश नजीर हे कर्नाटकचे आहेत. त्यांना गृहराज्यासह देशभरात झेड सिक्युरिटी कवच मिळणार आहे. केंद्रसरकारच्या आदेशानुसार, कर्नाटक सरकारकडून जस्टिस नजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना बंगळुरू, मंगळुरू आणि राज्यातील इतर भागांमध्ये झेड सुरक्षा दिली जाईल. झेड श्रेणीच्या सुरक्षेत सीआरपीएफच्या २२ जवानांचा समावेश असतो.