पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाची निरीक्षणे

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागेची मालकी रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांकडे देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचवेळी केंद्र सरकारने १९९३ मध्ये अधिग्रहित केलेल्या उर्वरित ६७.६ एकर जागेपैकी या पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाची निरीक्षणे पुढीलप्रमाणे...

१. भारतीय पुरातत्व खात्याने दिलेल्या अहवालाच्या आधारे हे स्पष्ट होते की बाबरी मशिद रिकाम्या जागेवर उभारण्यात आली नाही. तिथे आधीपासून एक संरचना (बांधकाम) होती. वादग्रस्त जागेवरच ही संरचना होती. त्या ठिकाणी पुरातत्व खात्याला मिळालेल्या पुराव्यांनुसार तिथे मिळालेले अवशेष इस्लामी पद्धतीचे नव्हते. 

२. वादग्रस्त जागेवरील मशिदीच्या आतील बाजूस मुस्लिम समाजाचे लोक नमाज पठण करीत होते, याचा कोणताही पुरावा मिळत नाही. त्याचबरोबर या मशिदीचा ताबा मुस्लिम समाजाकडे होता, याचाही कोणताही पुरावा मिळत नाही.

३. ब्रिटिश येण्याआधी सत्तेआधी राम चौथरा आणि सीता रसोई या ठिकाणी हिंदूंकडून प्रार्थना केली जात होती, याचेही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे वादग्रस्त ठिकाणी बाहेरील बाजूस हिंदूंचा ताबा होता हे स्पष्ट होते.

अयोध्या प्रकरण: हा कुणाचा विजय किंवा पराभव नव्हे - PM मोदी

४. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालात वादग्रस्त जमिनीचे केलेले तीन भाग अतार्किक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. आस्थेवर जमिनीचे वाटप होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

५. धर्म, राजकारण आणि श्रद्धा यापेक्षा न्याय हा पूर्णपणे स्वतंत्र आणि सर्वोच्च असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय ही धर्मनिरपेक्ष व्यवस्था असून, प्रत्येक धर्माचा सन्मान करते.