पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रीम कोर्टः मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने राम मंदिराचा नकाशा फाडला

सर्वोच्च न्यायालय

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज ४० व्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सायंकाळी याप्रकरणाची सुनावणी संपेल. आतापर्यंतच्या सुनावणीत हिंदू आणि मुसलमान पक्षकारांनी आपापली बाजू मांडली आहे. दरम्यान, न्यायालयात आजच्या सुनावणीदरम्यान मोठे नाट्य घडले. मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी एका पुस्तकावरील राम मंदिराचा छापील नकाशा फाडून टाकला. 

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणी आज पाच वाजता संपणार, सरन्यायाधीशांचे आदेश

सुनावनीदरम्यान राम मंदिरावर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्डच्या पुस्तकाचा हवाला देत मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी पुस्कातील नकाशा फाडला. मुस्लिम पक्षाच्या वकिलांच्या वर्तणुकीवर सरन्यायाधीश रंजन गोगोई नाराज झाले. जर अशाच प्रकारचे कामकाज चालणार असेल तर मी येथून मी निघून जाईन, असा सज्जड दम दिला.

दरम्यान, अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जागेच्या खटल्याची सुनावणी बुधवारी संध्याकाळी संपेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मंगळवारीच या खटल्याच्या अंतिम सुनावणीसाठी दोन्ही पक्षकारांना वेळ वाटून दिला आहे. बुधवारी सुनावणी सुरू झाल्यावर रंजन गोगोई यांनी आज पाच वाजता या प्रकरणी सुनावणी संपेल, असे सांगितले. सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाकडून या खटल्याचा निकाल राखून ठेवला जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यांच्या उत्तरार्धात या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ayodhya ram mandir case hearing muslim party lawyer tears ram temple map in supreme court