पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पूर्ण, निकाल राखीव

सर्वोच्च न्यायालय

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी ४० व्या दिवशी सुनावणी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने निकाल राखीव ठेवला आहे. सरन्यायाधीश गोगाई १८ नोव्हेबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महिन्याभराच्या ऐतिहासिक प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरन्यायाधीशांनी सायंकाळी ५ पर्यंत सुनावणी पूर्ण होईल, असे स्पष्ट केले होते. त्यांनी सांगितलेल्या वेळेच्या १ तास अगोदरच सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. 

अयोध्या सुनावणीःयूपीत हालचालींना वेग, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पक्षकारांना लेखी बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने तीन दिवसांचा अवधी दिला आहे. आयोध्या प्रकरणात नियमित सुनावणी निश्चित झाल्यानंतर ४० दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी आपली बाजू मांडली. न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी एका पुस्तकावरील राम मंदिराचा छापील नकाशा फाडल्याचा प्रकार घडला.  मुस्लिम पक्षाच्या वकिलांच्या वर्तणुकीवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.  

सुप्रीम कोर्टः मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने राम मंदिराचा नकाशा फाडला