पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्याः यूपी सुन्नी वक्फ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

उत्तर प्रदेश सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष जफर फारुकी

उत्तर प्रदेश सेंट्रल वक्फ बोर्डने अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादातील पक्षकार राहिलेल्या यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डने या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले. बोर्डचे अध्यक्ष जफर फारुकी म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि या निर्णयाला आव्हान देण्याचा आमचा कोणताच विचार नाही. 

आम्हाला खिरापत म्हणून ५ एकर जमीन नकोय: ओवेसी

ते म्हणाले की, ५ एकर जमीन घेण्यावरुन बोर्ड सदस्यांबरोबर चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. सर्वांनी आधीच न्यायालयाचा निर्णय मान्य असेल असे म्हटले होते. त्यामुळे पुनर्विचार याचिकेबाबत बोलणे चुकीचे ठरेल. 

लवकरच अडवाणींची भेट घेणार : उद्धव ठाकरे

दिल्लीत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी म्हणाले की, आम्ही नेहमीच म्हणत आलोय की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करु. मला विश्वास आहे की, देश आता विकासाकडे वाटचाल करेल. पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत मी सहमत नाही.

अयोध्या निकालानंतर लगेचच Uniform Civil Code ट्रेंडमध्ये