अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर देशातील तमाम हिंदू धर्मगुरुंनी त्याचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना धर्मगुरुंनी लवकर राम मंदिर उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर समाजातील नागरिकांनी परस्परांमध्ये सौहार्दाच्या भावनेचा परिचय देण्याचे आवाहन धर्मगुरुंनी केले आहे. रामदेव बाबांनी हिंदूंनीही मुस्लिमांसाठी मशीद निर्मितीत मदत केली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
अयोध्या निकालानंतर लगेचच Uniform Civil Code ट्रेंडमध्ये
Baba Ramdev: This is a historic verdict. A grand Ram temple will be built. Decision to allot alternate land to Muslim side is welcome, I believe Hindu brothers should help in the construction of the Masjid as well. #Ayodhyajudgement pic.twitter.com/wcijPEkQ2Q
— ANI (@ANI) November 9, 2019
शनिवारी अयोध्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा यांनी त्याचे स्वागत केले. ते म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय आला आहे. आता अयोध्येत भव्य मंदिर होईल. पण आपल्याला असे काही करायचे नाही की, ज्यामुळे समाजात भय किंवा आक्रोश निर्माण होईल. प्रभू श्रीराम यांनी ज्या मर्यादा पाळल्या त्या मर्यादेचे आपल्याही पालन करायचे आहे आणि माझ्या मते हिंदू बांधवांनीही मशीद निर्मितीसाठी मदत केली पाहिजे.
दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत
दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कोणा एका पक्षाचा विजय किंवा दुसऱ्या पक्षाचा पराभव समजू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नेरंद्र मोदींनी देशवासियांना शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. राम भक्त असा किंवा रहिम भक्त ही वेळ राष्ट्रभक्तीची आहे. त्यामुळे देशवासियांनी शांती, सदभाव आणि एकता कायम राखावी, असे मोदींनी म्हटले आहे.