पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विदेश दौरा केला रद्द

सरन्यायाधीश रंजन गोगोई

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपला विदेश दौरा रद्द केला आहे. त्यांना काही अधिकृत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विदेशात जायचे होते. सूत्रांनी सांगितले की, अयोध्या जमीन वाद प्रकरणी खंडपीठाचे नेतृत्व करत असलेले गोगोई यांनी काही अपरिहार्य कारणास्तव विदेश दौरा रद्द केला आहे. गोगोईंच्या नेतृत्वाखालील पीठाने अयोध्याप्रकरणी बुधवारी सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला आहे.

शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरतायेत : राज ठाकरे

सरन्यायाधीश १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत होण्यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील काही देश, मध्य पूर्व आणि काही अन्य देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. सूत्रांनी सांगितले की, या दौऱ्याला अंतिम रुप मिळण्यापूर्वीच सरन्यायाधीशांनी हा विदेश दौरा रद्द केला आहे. गोगोई यांनी गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला भारताचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. याबाबत, 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे.

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर गेल्या ४० दिवसांपासून अयोध्या प्रकरणी खटल्याची सुनावणी सुरु आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान दिला जाण्याची शक्यता आहे. कारण सरन्यायाधीश गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत.

मुंबईकराचा द्विशतकी विश्वविक्रम 'यशस्वी'