पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या नगरीत दीपोत्सवाचा विक्रमी 'प्रकाश'

अयोध्या नगरीत दिपोत्सवाचा उत्साह

दिवाळीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी दीपोत्सवाने लखलखीत झाल्याची पाहायला मिळाले. शरयू नदीच्या काठावर आणि संपूर्ण अयोध्या शहरात तब्बल ५ लाख ५१ हजार दिवे प्रज्वलीत करण्यात आले होते. दीपोत्सवाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन यांच्यासहन अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे दिवाळीनंतर सेनेचा बार फुसका निघणार?

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात-पात न पाहता सर्वांना समान अधिकार देत देशात रामराज्य प्रस्थापित केले. केंद्रसरकारडून भेदभाव न करता कल्याणकारी योजना लागू केल्या जात आहेत, असा उल्लेखही त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यापूर्वी केला. दिप प्रज्वलीत करण्यापूर्वी मध्य प्रदेश, झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यातील कलाकारांनी नृत्य अविष्काराने सर्वांची मनं जिंकली. स्थानिक नागरिकांसह देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक या दिपोत्सवात  सहभागी झाले होते.

मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात टक्कर, पण हरियाणात खट्टरच!

प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत गेल्या चार दिवसांपासून दीपोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शनिवार सायंकाळी १४ ठिकाणी मिळून ५ लाख ५१ दिप प्रज्वलीत करण्यात आले. शरयू नदीच्या किनाऱ्यावर जवळपास ४ लाख दिप लावण्यात आले आहेत. दीपोत्सवातील कार्यक्रमातील उत्साह वाढवण्यासाठी विविध देशातील कलाकार देखील रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात भारतासह नेपाळ, श्रीलंका इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स या राष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.