पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येतील मशिद इस्लामी संस्कृतीनुसार आहे की नाही याचाही फैसला करणार - सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर बांधण्यात आलेली मशिद इस्लामी संस्कृती आणि भावना यांच्या नुसार उभारण्यात आली आहे की नाही, याचाही न्यायालय निर्णय करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय पीठापुढे या प्रकरणी रोजच्या रोज सुनावणी सुरू आहे. यावेळी राजजन्मभूमी पुनरुद्धार समितीचे वकील पीएन मिश्रा यांनी, वादग्रस्त जागेवर उभारण्यात आलेली मशिद इस्लामिक संस्कृतीनुसार बांधण्यात आलेली नसल्याचे आपला युक्तिवाद करताना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने वरील भूमिका मांडली.

सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नका, प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपचे आदेश

मिश्रा म्हणाले की, वादग्रस्त जागेवरील मशिद इस्लामिक संस्कृतीनुसार उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याला मशिदही म्हणता येणार नाही. या जागी कधीच नियमित नमाज पठण करण्यात आले नाही. हनिफी इस्लामिक कायद्यानुसार जेव्हा स्वतंत्रपणे जागा खरेदी करून त्या ठिकाणी मशिद उभारण्यात येते. त्यावेळीच त्याला मशिद मानले जाईल, असे म्हटले आहे. या जागेचे लोकार्पण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या वास्तूच्या जवळ इतर कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थान नसले पाहिजे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

अमित शहांचे कौतुक करताना मुकेश अंबानी काय म्हणाले माहितीये?

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर उभारण्यात आलेली मशिद ही जमीन बळजबरीने ताब्यात घेऊन तिथे बांधण्यात आली आहे. तिथे हिंदू लोक पूजा करीत होते, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.