अयोध्या प्रकरणी ९ नोव्हेंबरला आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. यासाठी तयारीही सुरु झाली आहे. याबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि बाबरी मशीद खटल्याचे प्रमुख वकील डॉ. राजीव धवन यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या 'ब्ल्यूप्रिंट'वर आज होणार शिक्कामोर्तब
'हिंदुस्थान'शी बोलताना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव जफरयाब जिलानी यांनी सांगितले की, तीन पक्षकार मौलाना महफूजुर्रहमान, मोहम्मद उमर और मिसबाहुद्दीन यांच्याकडून दाखल करण्यात येणाऱ्या याचिकांवर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड बाजू मांडेल. जमीयत उलेमा-ए-हिंद यांच्याकडून एक वेगळी पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. अशा पद्धतीने बाबरी मशिदीच्या जमिनीसाठी मुस्लीम पक्षाकडून एकूण चार पुनर्विचार याचिका दाखल होतील.
सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राचा मोठा खुलासा
जफरयाब जिलानी म्हणाले की, या तीन वादी पक्षकरांशिवाय हाजी अब्दुल अहमद यांचा मुलगा मोहम्मद सगीर आणि हसबुल्लाह उर्फ बादशाह प्रतिवादी आहेत. गरज पडल्यास त्यांच्याकडूनही पुनर्विचार याचिका दाखल केल्या जातील. मुस्लीम पक्षाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत वेळ आहे.
शरद पवारांच्या दिल्लीतील 'त्या' वक्तव्यामागे दडलेल्या ५ शक्यता