पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यात न्यायालयाचा दोन्ही पक्षकारांना महत्त्वाचा आदेश

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याची सुनावणी कोणत्याही स्थितीत १८ ऑक्टोबरपर्यंत संपविण्यात यावी. १८ ऑक्टोबरनंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एकही जादा दिवस दिला जाणार नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी दोन्ही पक्षकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरचा अंतिम दिवस दिला आहे.

कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी

सुनावणीनंतर निकाल देण्यासाठी न्यायालयाला केवळ चार आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. जर चार आठवड्यात निकाल लिहून तो दिला गेल्यास ते एक नवे आश्चर्य असेल, असेही रंजन गोगोई यांनी सांगितले. येत्या १७ नोव्हेंबर रोजी रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी या खटल्याचा निकाल देणे आवश्यक आहे. एकूण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. यामध्ये सरन्यायाधीशांसोबत न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. 

हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद या खटल्याचा निकाल लवकर देण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून न्यायालयाने या प्रकरणी रोजच्या रोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने एक मध्यस्थ समितीही नेमली होती. पण दोन्ही पक्षकारांमध्ये तोडगा काढण्यास मध्यस्थ समितीला अपयश आले. त्यानंतर न्यायालयाने रोजच्या रोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली.