पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवार महत्त्वाचा दिवस

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याच्या सुरू असलेल्या सुनावणीचा उद्या, बुधवारी शेवटचा दिवस आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मंगळवारीच या खटल्यातील दोन्ही पक्षकारांना बुधवारी सुनावणीचा अखेरचा दिवस असल्याचे सांगितले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा मंगळवारी ३९ वा दिवस आहे. तर ४० वा दिवस सुनावणीचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी न्यायालय या प्रकरणा निकाल देणे अपेक्षित आहे. रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. 

उरलेले आयुष्य कोकणाच्या विकासासाठी घालवणार: नारायण राणे

या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी मुस्लिम पक्षकारांनी केवळ आपल्यालाच प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप केला. हिंदू पक्षकारांना प्रश्न विचारले जात नसल्याचे मुस्लिम पक्षकारांनी म्हटले आह. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या खंडपीठामध्ये सरन्यायाधीशांसोबत न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस अब्दुल नाजिर यांचा समावेश आहे. 

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस

दसऱ्या निमित्त गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला सुटी होती. त्यानंतर सोमवारी या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणी न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ayodhya case in supreme court cji ranjan gogoi says tomorrow is 40th day and last day of hearing in ram mandir babri masjid land dispute case