पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणी आज पाच वाजता संपणार, सरन्यायाधीशांचे आदेश

सरन्यायाधीश रंजन गोगोई

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जागेच्या खटल्याची सुनावणी बुधवारी संध्याकाळी संपेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मंगळवारीच या खटल्याच्या अंतिम सुनावणीसाठी दोन्ही पक्षकारांना वेळ वाटून दिला आहे. बुधवारी सुनावणी सुरू झाल्यावर रंजन गोगोई यांनी आज पाच वाजता या प्रकरणी सुनावणी संपेल, असे सांगितले.  सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाकडून या खटल्याचा निकाल राखून ठेवला जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यांच्या उत्तरार्धात या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते. 

विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुकलीचा मृत्यू

सरन्यायाधीशांनी सांगितले की, या खटल्यातील हिंदू पक्षाचे वकील सी एस वैद्यनाथन यांना एक तास मिळेल. तर मुस्लिम पक्षाच्या वकिलांनाही एक तास आपली बाजू अंतिम स्वरुपात मांडण्यासाठी दिला जाईल. भोजनाच्या सुटीनंतर उर्वरित वेळ हा इतर पाच पक्षकारांसाठी दिला जाईल. यामध्ये प्रत्येक पक्षकाराला ४५ मिनिटांमध्ये आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे. भोजनाच्या सुटीनंतर तीन तास उपलब्ध आहेत. ते उर्वरित पक्षकार त्यांच्या आवश्यकतेनुसार वाटून घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पाच वाजल्यानंतर या प्रकरणी पक्षकारांची बाजू ऐकून घेतली जाणार नाही.

या खटल्याच्या सुनावणीचा बुधवार चाळीसावा दिवस आहे. मंगळवारी ३९व्या दिवशीच न्यायालयाने बुधवारी सुनावणी संपविण्याचे निर्देश दिले होते. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात रोजच्या रोज या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. तत्पूर्वी न्यायालयाने या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी एक मध्यस्थ समितीही नेमली होती. पण या समितीला न्यायालयाबाहेर या प्रकरणावर तोडगा काढण्यास अपयश आले. त्यामुळे अखेर न्यायालयाने रोजच्या रोज आपली सुनावणी सुरू केली. 

२४ तासात पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखाली न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस अब्दुल नाजिर यांच्या खंडपीठामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. एकूण १४ याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या असून, त्यावर एकत्रित सुनावणी सुरू आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ayodhya case 70 year old dispute will be debated in sc today know how much time anyone will get on the last day