पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

अवंतीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली (ANI)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पुलवामातील अवंतीपोरा परिसरात राजपुरा गावात झालेल्या या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबधित असल्याचे बोलले जात आहेत. मृत तीन दहशतवाद्यांपैकी दोघे जण पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराला मंगळवारी दुपारी पुलवामामधील अवंतीपोराजवळ दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर तात्काळ लष्काराच्या राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफचे पथक घटनास्थळी गेले. परिसराला घेराव घातला गेला. 

चेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक

शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी ते ठिकाण घेरले आणि जिथे दहशतवादी लपले होते, तिथे गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुमारे ४ तासांच्या ऑपरेशननंतर दहशतवादी मारले गेले.

दहशतवाद्यांबरोबरील चकमकीदरम्यान तणावाची स्थिती रोखण्यासाठी मोठ्या संख्येत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान तिथे तैनात करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर परिसरात शोध मोहीमही राबवण्यात येत आहे.