पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात ४ जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर

उत्तर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी संध्याकाळी हिमस्खलन झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये लष्कराच्या ४ जवानांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि बांदिपोरा जिल्ह्यात भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या असून त्यात जवान बेपत्ता झाले होते.  यामधील ४ जवानांचा मृत्यू झाला तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पत्ता एआरटीकडून बचावकार्य करण्यात आले. 

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नक्की काय केलं वाचा...

मिळालेल्या माहितीनुसार, हिमस्खलनाच्या दोन घटना बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातल्या करनाह सेक्टरमध्ये झाली आहे. हे दोन्ही भाग उत्तर काश्मीरच्या अंतर्गत येतात. १८ हजार फूट उंचिवर असलेल्या या भागात हिमस्खलन झाले. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ४ जवानांचा मृत्यू झाला. तर दोन जवानांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आले. या जवानांवर उपचार सुरु आहेत. 

गुगलमध्ये सुंदर पिचाईंकडे आणखी मोठी जबाबदारी

लष्कराकडून ऐवलॉन्स रेस्क्यू टीम आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध घेण्यात आला होता. दरम्यान,  सियाचिन ग्लेशियर येथे वेगवेगळ्या ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. दोन आठवड्यात झालेल्या या घटनांमध्ये ६ जवान शहीद झाले आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत आज निर्णय?