पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकला अगोदर चीनने वाचवले अन् आता कोरोनाजन्य परिस्थितीनं

इम्रान खान

दहशतवादाला रसद पुरवण्याच्या कारणावरुन पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत 'फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स'कडून (एफएटीएफ) कडून मिळाले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एफएटीएफचे कामकाज पुढील काही दिवस बंद राहणार असल्यामुळे पाकिस्तानवरील संकट तूर्तास टळले आहे. दहशतवादाला थारा देण्याच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी अनेकदा चीनने पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट करण्यापासून वाचवले होते. आता याच चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे पाकिस्तानली आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे.

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारचा खास प्लॅन

पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईची पूर्तता न केल्यामुळे 'एफएटीएफ'च्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आढावा गटाच्या (आयसीआरजी) पॅरिस येथे झालेल्या बैठकीत त्यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. एवढेच नाही तर दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अर्थिक मदतीला आळा घालण्यासाठी २७ सूत्री कार्यक्रमाची पाकिस्तानने अंमलबजावणी केलेली नाही, असा ठपका देखील पाकवर ठेवण्यात आला होता. ही मुदत संपत असतानाच जगभरात कोरोनाचे संकट आल्यामुळे पाकला आता अधिक अवधी मिळणार आहे. यापूर्वी चीन, मलेशिया आणि तुर्की यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत जाण्यापासून वाचवले होते. 

पाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज बंद असले तरी पैशाचा गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना पुरवली जाणारी रसद यावर लक्ष ठेवून असल्याचे पॅरिसस्थित एफएटीएफने स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये जाऊन यासंदर्भातील आढावा घेणे शक्य नाही. २१ ते २६  जून दरम्यान पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात दिलेल्या कारवाईसंदर्भात नेमके काय केले यासंदर्भातील आढावा घेण्यात येणार होती. मात्र ही बैठक आता ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. एफएटीएफने दिलेल्या २७ सूत्री कार्यक्रमापैकी १४ गोष्टींवरच पाकिस्ताने काम केले होते. उर्वरित गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पाककडे आता ऑक्टोबरपर्यंत वेळ असेल. पुढच्या बैठकीत पाकिस्तानकडून यासंदर्भात समाधानकारक गोष्टी झाल्याचे आढळले नाही तर त्यांचा समावेश काळ्या यादीत करण्यात येऊ शकतो.