पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अटलबिहारी वाजपेयी प्रथम स्मृतिदिन : राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

रामनाथ कोविंद आणि नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदैव अटल स्मारकाजवळ जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही शुक्रवारी सकाळी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.

दीर्घ आजाराने गेल्यावर्षी १६ ऑगस्ट रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचे संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते.