पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांची सन्मानिका पहिल्या रांगेचीच, राष्ट्रपती कार्यालयातील अधिकाऱ्यांचा खुलासा

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात पाचव्या रांगेतील सन्मानिका दिली गेल्याच्या चर्चेवर बुधवारी राष्ट्रपती कार्यालयातील राष्ट्रपतींचे जनसंपर्क सचिव अशोक मलिक यांनी खुलासा केला. सर्वात आधी त्यांनी शरद पवार यांना पाचव्या रांगेतील सन्मानिका दिल्याची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी नक्की काय घडले याची माहिती दिली.

राहुल यांच्यासोबतच्या भेटीत विलिनीकरणावर चर्चा नाही: शरद पवार

शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांना इंग्रजीतील V विभागातील सन्मानिका देण्यात आली होती. शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्वच ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांसाठी ही सन्मानिका देण्यात आली होती. त्यातही शरद पवार यांच्यासाठी V सन्मानिकेतही पहिल्या रांगेतील जागा राखीव होती. पण त्यांच्या कार्यालयातील कोणीतरी V या इंग्रजी अद्याक्षराचा चुकीचा अर्थ लावला असावा आणि पाचव्या रांगेची सन्मानिका असा गैरसमज करून घेतला असावा, असे अशोक मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

...म्हणून शरद पवार मोदींच्या शपथविधीला अनुपस्थित राहिले

३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला. या कार्यक्रमाला देश-विदेशातील वरिष्ठ नेते, अधिकारी उपस्थित होते. शरद पवार हे नवी दिल्लीत असूनही या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून ही चर्चा सुरू झाली होती. शरद पवार यांनी यासंदर्भात अधिकृतपणे काहीही भूमिका मांडलेली नाही. शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:At the swearing in ceremony Sharad Pawar was invited to the V section where the most senior guests sat ashok malik tweets