पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : इम्रान खान यांच्याकडून पुन्हा एकदा शिष्टाचाराचा भंग

इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय परिषदेतील शिष्टाचाराच्या संकेतांचा भंग झाला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO परिषदेमध्ये उदघाटनाच्या सत्रात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख येत असताना इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचाराचा भंग झाला.

दहशतवादाला मदत, अर्थसहाय्य करणाऱ्या देशांना जबाबदार धरा - मोदी

राष्ट्रप्रमुख त्यांच्या आसनाकडे येत असताना सभागृहातील सर्व लोक आणि सभागृहात आलेले राष्ट्रप्रमुख उभे राहून मागून येणाऱ्यांचे स्वागत करीत होते. पण यावेळी इम्रान खान त्यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीमध्ये बसलेले दिसले. काही क्षणांनी ते आपल्या खुर्चीवरून उठून इतरांप्रमाणे येणाऱ्यांचे स्वागत करू लागले. पण नंतर पुन्हा एकदा ते खुर्चीत खाली बसले. 

पाकिस्तानातील 'पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ'ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.  इम्रान खान यांच्याकडून याआधी सौदी अरेबियात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत शिष्टाचारांचा भंग झाला होता.