पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी शेतकरी अन् व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पाळला

कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

विक्रमी बहुमताने पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी सरकारने 'प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना' सुरु केली आहे. कॅबिनेटने शुक्रवारी या योजनेला मंजूरी दिली. देशातील छोट्या आणि अल्प भू-धारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा देशातील जवळपास १४.५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना प्रति महा ६ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.   

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते 'संकल्प पत्र' या नावाने भाजपने आपले घोषणा पत्र जारी केले होते. यात शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा समावेश करण्यात आला होता. सत्तेत आल्यानंतर भाजपने शेतकऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांसाठीच्या पेन्शन योजनेला देखील मंजूरी देण्यात आली. देशातील ३ कोटी घाऊक आणि छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.