पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफगाणिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; ४८ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान बॉम्बस्फोट

निवडणुकीपूर्वी अफगाणिस्तान आत्मघाती बॉम्बस्फोटाने हादरले आहे. काबूल आणि परवान प्रांतामध्ये मंगळवारी सायंकाळी दोन आत्मघाती हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला. तर ८० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सरकार नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात फेरविचार करेल : मुख्यमंत्री

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परवान प्रांतात राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्या रॅली दरम्यान पहिला आत्मघाती हल्ला झाला. हल्लेखोरांनी मोटारसायकलवर येत रॅलीजवळ असलेल्या पोलिस ठाण्यावर बॉम्ब फेकला. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले. तर दुसरा हल्ला एका तासानंतर काबूलमधील अमेरिका दुतावास कार्यालयाजवळ झाला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. या बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला तर ३८ नागरिक गंभीर जखमी झाले. 

एक दिवस पीओके भारताचा हिस्सा असेलः परराष्ट्र मंत्री एस

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटावेळी घटनास्थळी मोठी गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या बॉम्बस्फोटात राष्ट्रपतींना दुखापत झाली नाही. ते सुरक्षित आहेत, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेत. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर अफगाणिस्तानमध्ये सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास, भाजपत प्रवेश करणारः राणे