पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काबूलः लग्न सोहळ्यात आत्मघातकी स्फोट, ६३ जण ठार

संग्रहित छायाचित्र

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ६३ लोक ठार तर १८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोलो न्यूजने गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, हा स्फोट पश्चिम काबूलमधील एक लग्न समारंभात झाला. या समारंभात एक हजारहून अधिक पाहुणे सहभागी झाले होते. मृतांची संख्या आणखी वाढू शकते. मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार १०.४० (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.४०) वाजता घडली. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली नसल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहिमी यांनी सांगितले. या हल्ल्यामागचे कारणही समजू शकलेले नाही. या परिसरात अल्पसंख्यक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त, भारताचे चोख प्रत्युत्तर

'हल्लेखोरांनी समारंभा दरम्यान उपस्थित लोकांच्या मधोमध स्फोट घडवला. हा स्फोट लग्नाच्या मंचाजवळ झाला. तिथे बँड पथक उपस्थित होते,' असे नुसरत रहिमी यांनी सांगितले. हल्ल्यात अनेक मुलं ठार झाल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. स्फोटानंतर सभागृहात एकच आक्रोश झाला आणि गोंधळ उडाला.

केरळमध्ये पावसाचा प्रकोप, पुरामुळे ११३ जणांचा मृत्यू 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:At least 40 people have been killed and more than 100 others are wounded in the blast at Kabul wedding Afghanistan