पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नौदलातील २५ जणांना कोरोनाची लागण

संग्रहित छायाचित्र

भारतीय नौदलातील २५ नौसैनिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या सर्वांना उपचारांसाठी मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात हलिवण्यात आलं आहे, अशी माहिती नौदलातील दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन हिंदुस्थान टाइम्सला दिली आहे. 

टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आयसीसीकडून स्पष्टीकरण

नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची  लागण झाल्याचं हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाच्या आयएनएस आंग्रे या तळावर ७ एप्रिलला कोरोना बाधित पहिली केस समोर आली होती.  कोरोनाची लागण झालेल्या २५ पैकी २० जण हे आयएनएस आंग्रे तळावरील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. सध्या आयएनएस आंग्रे तळ हे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला, सरकारचे मालकांना निर्देश

नौदल अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह यांनी गेल्या आठवड्यात व्हिडिओद्वारे संदेश दिला होता यात त्यांनी नौदलाला  कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. अमेरिकन नौदलात कोरोना विषाणूची बाधा झालेले अनेक नौसैनिक समोर आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नौदलानंही संकटाशी सामना करण्यास तयार राहावं  असं आवाहन करण्यात आलं आहे.