पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरण : पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते न्यायालय

उन्नाव बलात्कार प्रकरण

उन्नाव प्रकरणातील पीडितेचा साक्ष नोंदविण्यासाठी बुधवारी विशेष न्यायाधीश धर्मेश शर्मा हे स्वतः थेट दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात पोहोचले. या खटल्याची साक्ष नोंदविण्यासाठी अशा पद्धतीने स्वतः न्यायाधीश रुग्णालयात पोहोचल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. उन्नाव प्रकरणातील पीडितेने भाजपमधून निलंबित करण्यात आलेले आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच पीडिता आणि तिचे नातेवाईक निघालेल्या मोटारीचा अपघात झाला होता. हा अपघात नसून, घातपात असल्याचे आणि पीडितेला संपविण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी मुंबई अध्यक्षांना बोलावले

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेत संबंधित तरुणीला हवाई रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. रायबरेलीजवळ हा अपघात घडला होता. कुलदीप सिंह सेनगर यांच्या सांगण्यावरूनच हा अपघात घडवून आणण्यात आला होता, असा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला.

वाहतूक नियमः गुजरातने ९० टक्क्यांपर्यंत कमी केली दंडाची रक्कम

गेल्या आठवड्यात या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला होता. त्यामध्ये न्या. धर्मेश शर्मा यांना एम्समध्ये जाऊन पीडित तरुणीची साक्ष नोंदविण्यास मंजुरी देण्यात आली होती. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेनगर आणि सहआरोपी शशी सिंह यांनाही आजच्या विशेष सुनावणीसाठी एम्समध्ये आणण्यात येणार आहे.