पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या प्रचारातून आक्रमकपणा 'गायब', नेत्यांची पाठ

सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शनिवारी अखेरचा दिवस आहे. येत्या सोमवारी या दोन्ही राज्यांत मतदान होते आहे. यावेळी या दोन्ही राज्यातील काँग्रेसच्या प्रचारात आक्रमकपणा नसल्याचे प्रामुख्याने दिसून आले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या दोन्ही राज्यांत एकही प्रचारसभा घेतली नाही. प्रियांका गांधी यासुद्धा प्रचाराला आल्या नाहीत. एकीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार झंझावाती प्रचार करीत असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात न उतरण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसले.

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त

हरियाणामध्ये महेंद्रगढमध्ये सोनिया गांधींची शुक्रवारी सभा होणार होती. पण प्रकृती ठीक नसल्यामुळे ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली. त्यांच्याऐवजी राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतली. महाराष्ट्रातही काही ठिकाणी राहुल गांधी यांनी सभा घेतल्या. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या पद्धतीने आक्रमकपणे प्रचार केला होता. तशी आक्रमकता या प्रचारात दिसली नाही. काँग्रेसचे इतर राज्यातील अनेक नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेही नाहीत. 

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे आक्रमक प्रचार करून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे प्रयत्न पक्षाकडून होणे अपेक्षित होते. या दोन्ही राज्यांत प्रचारासाठी राजकीय पक्षांना सुमारे १५ दिवसांचा कालावधी मिळाला होता. 

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!

पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ज्यांचे नाव होते. त्यापैकी अनेक नेते प्रत्यक्ष प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेच नाहीत. प्रियांका गांधी याही प्रचारात सहभागी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरचे नेते प्रचारात न उतरल्यामुळे सर्व जबाबदारी राज्यातील नेत्यांवर येऊन पडली.