पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आसाममधील नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, १९ लाख लोक बाहेर

आसाममधली राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर

आसाममधली  बहुप्रतिक्षित अशी राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (NRC) अंतिम यादी शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर आसाममध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या यादीत स्थान मिळवण्यास १९ लाख लोक अयशस्वी ठरले आहेत. तर ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ नागरिकांनी या यादीत स्थान मिळवले आहे. हे ३ कोटी लोक राज्याचे नागरिक म्हणून ओळखले जाणार आहेत. 

गेल्या चार महिन्यापासून हे काम सुरू आहे तर ४० वर्षांपासून अवैध पद्धतीनं आसाममध्ये घुसलेल्या निर्वासितांना देशाबाहेर काढण्याची मागणी होत आहे. या राज्यातील मूळ स्थानिकांसोबत लाखो लोक अवैधरित्या भारतात राहत आहेत. एनआरसी मोहिमेत याच बेकायदा घुसखोरांचा शोध घेतला जात आहे.  या घुसखोरांना हाकलण्याची मागणी होत होती. गेल्या ६८ वर्षांपासून राज्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणी झालीच नव्हती. 

धुळेः शिरपूर तालुक्यातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, ७ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे समन्वकांनी दिलेल्या  माहितीनुसार एकूण ३ कोटी २९ लाख लोकांनी नागरिक नोंदणीसाठी अर्ज केले होते त्यानंतर जाहीर होणाऱ्या  यादीमुळे मूळ भारतीय नागरिकांमधून येथे अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना वेगळं करता येणं शक्य होणार आहे. एकूण ३ कोटी २९ लाख लोकांपैकी राष्ट्रीय नागरीक नोंदणीच्या यादीत स्थान मिळवण्यास १९ लाख ६ हजार ६५७ लोक अपात्र ठरले आहेत.

ज्या लोकांचे नाव या यादीत नसेल त्यांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहान आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असंही सोनोवाल यांनी जनतेला सांगितलं. 

आता देशात केवळ १२ राष्ट्रीय बँका, निर्मला सीतारामन यांची घोषणा

एनआरसीच्या अंतिम यादीत नाव नसल्यास तो परदेशी नागरिक असणार  असा अर्थ होत नाही. त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेईन. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची त्यांना संधी दिली जाईन, असंही सोनोवाल यांनी सांगितले. १९५१ मध्ये पहिली नागरिकत्व नोंदणी करण्यात आली होती.  

पाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्यासाठी भारत सज्ज