पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरु; कायद्याला विरोध कायम

आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरु

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. हा कायदा लागू झाला तेव्हापासून ईशान्य भारतामध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आल्यामुळे आसाममधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तब्बल १० दिवसांनंतर सरकराने इंटरनेट सेवा पुन्हा सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरु झाली आहे.

 

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, 'काही लोकं चूकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. हे लोकं समाजाचे शत्रू आहेत. पुढे त्यांनी असे सांगितले की, 'आसामी भाषा कायम राज्य भाषा म्हणून जतन केली जाईल. कोणत्याही प्रकारे आसामचा सन्मान प्रभावित होणार नाही. आम्ही नेहमीच जनतेच्या समर्थनार्थ राहू आणि राज्यात शांततेत पुढे जाऊ.'

कोल्हापुरात पूरग्रस्त भागातील महिलांचा महामार्गावर रास्ता रोको

आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरविरोधात ११ डिसेंबरपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला अनेक जिल्ह्यात हिंसक वळण आल्यामुळे राज्य सरकारने या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता या भागातील इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र आसाममध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध कायम आहे. 

CAA: हिंगोलीत ३ एसटी बस फोडल्या, २ जण जखमी