पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्याः निकालावेळी वारंवार झाला पुरातत्व विभागाच्या अहवालाचा उल्लेख

अयोध्या प्रकरणः निकालावेळी वारंवार झाला पुरातत्व विभागाच्या अहवालाचा उल्लेख

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) ज्या अहवालाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने वारंवार केला, तो अहवाल एएसआयचे तत्कालीन संचालक हरी मांझी आणि तत्कालीन प्रभारी अधिक्षक बी आर मणी यांनी तयार केला होता. या दोन्ही पुरातत्व तज्ज्ञांनी वर्ष २००३ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशावर अयोध्याच्या वादग्रस्त स्थळी उत्खनन करुन अहवाल तयार केला होता. 

अयोध्यामध्ये वादग्रस्त परिसराच्या आसपास रिकामी जागा नव्हती. १२ व्या शतकाआधीपासून तिथे वसाहत होती. त्याचबरोबर वादग्रस्त जागेवरील मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष मिळाले. त्याच्या आधारावर आधी तिथे मंदिर होते, असे म्हटले जाऊ शकते. त्यापूर्वी १९६९-७० पासून १९७५-७६ दरम्यान एएसआयकडून प्रोफेसर बी बी लाल यांनी आपल्या पथकासह अयोध्येतील वादग्रस्त परिसराजवळ उत्खनन केले आणि आपला अहवाल तयार केला होता.

'..तर पर्यायी सरकारला पाठिंब्याचा विचार करुः नवाब मलिक

१२ मार्च २००३ ला तत्कालीन रिसिव्हर व मंडलायुक्त रामशरण श्रीवास्तव यांच्या निगराणीखाली एएसआयच्या पथकाने उत्खनन कार्य सुरु केले. घटनास्थळी हिंदू व मुस्लिम पक्षाचे वकीलही उपस्थित होते. एएसआयच्या पथकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांचे तज्ज्ञ होते. या पथकाचे नेतृत्व डॉ. बी आर मणी करत होते. सुमारे दोन महिन्यांपर्यंत एएसआयने या जागेवर खोदकाम केले. यासाठी १३१ मजूर कार्यरत होते. ११ जूनला एएसआयने अंतरिम अहवाल जारी केला आणि ऑगस्ट २००३ मध्ये उच्च न्यायालयामध्ये ५७४ पानांचा अंतिम अहवाल सोपवला. 

कोंडी कायम असताना राज्यपालांकडून BJP ला सत्तास्थापनेचे आमंत्रण

राम चबुतराखालीही एक दगडाचा चबुतरा

खांबाच्या आधारावर म्हणजेच खांबाखालील भाग हा कच्च्या विटांनी बांधला होता. उत्खन्नात सर्व खांब एका रांगेत आढळून आले होते. हे सर्व खांब एकमेकांपासून सुमारे ३.५ मीटर लांब होते. खोदकामावेळी राम चबुतऱ्याच्या खाली आणखी एक चबुतरा मिळाला होता. तो २१x७ फुटांचा दगडाने बनवला होता. याच्या ३.५ फूट उंचीवर ४.७५x४.७५ फूट उंचीवर दुसरा चबुतरा मिळाला. यावर पायऱ्याही होत्या, ज्या खाली जात होत्या. या अहवालात त्यांनी लिहिले की, उत्खन्नात मिळालेल्या वस्तू आणि खांबांच्या अवशेषांवरुन बाबरी मशिदीखाली एक मंदिर होते, हे समजते. त्यानंतर १९९० ते ९२ दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने वादग्रस्त परिसराचे समतलीकरण करण्याचे काम सुरु केले. त्यावेळी तिथे काही अवशेष मिळाले होते. त्यावर मुस्लिम पक्षांनी आक्षेप घेत हे अवशेष तिथे बाहेरुन आणून टाकल्याचा आरोप केला होता.

विविधतेत एकतेचा मंत्र पाहायला मिळालाः पंतप्रधान मोदी

उत्खन्नात १३ व्या शतकापूर्वीचे अवशेष मिळाले. यामध्ये कुषाण, शुंगकालपासून ते गुप्त आणि प्रारंभिक मध्य युगाचे अवशेष मिळाले. प्रारंभिक मध्य युगातील अवशेषात ११-१२ व्या शतकातील ५० मीटर उत्तर-दक्षिण इमारतीचे अवशेष मिळाले. त्याच्यावर आणखी एक विशाल इमारत होती. ती रहिवासी इमारत नव्हती तर सार्वजनिक उपयोगाची इमारत होती. अहवालानुसार, या भग्नावशेषावर वादग्रस्त इमारत (मशीद) १६ व्या शतकात बांधण्यात आली.

अयोध्याः सुन्नी वक्फ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही